ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्य्रात बंदी !
ठाणे – येथील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २७ मार्च ते ९ एप्रिल या काळात मुंब्रा शहरात आणि आसपासच्या परिसरात येण्यास १४४ कलमाच्या अंतर्गत ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. सध्या रमझानचा मास चालू असल्याने आणि मुंब्रा परिसर संवेदनशील असल्याने अशाप्रकारचे आदेश काढण्यात आले आहेत.
गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामाचे सूत्र उपस्थित केल्यावर जाधव यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मुंब्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अवैध मजार आणि मशिदी हटवण्याचे आवाहन केले होते. मुंब्रादेवी डोंगरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात अविनाश जाधव यांनी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांना पंधरा दिवसांची समयमर्यादा दिली आहे. यानंतर ‘जर कारवाई केली नाही तर या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधू’, असेही जाधव यांनी म्हटले होते.
संपादकीय भूमिकापरिसर संवेदनशील का झाला, याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सांगणार्यांवरच कायद्याचा बडगा उगारण्यात येतो. हिंदुत्वनिष्ठ शासनाच्या काळात नेमके कसे असायला हवे ?, हे आता जनतेने ठरवायला हवे ! |