‘प्रॉव्हिडंड फंड’वरील व्याजदरात वाढ !
८.०५ टक्क्यांंवरून झाला ८.१५ टक्के !
नवी देहली – केंद्रशासनाच्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या बैठकीत कर्मचार्यांच्या प्रॉव्हिडंड फंड (पी.एफ्.) रकमेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ने दिले आहे. देशभरात सध्या जवळपास ५ कोटी पी.एफ्. खातेधारक असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
#BREAKING | EPFO fixes 8.15% interest rate on employees’ provident fund for 2022-23. pic.twitter.com/n2QYqrmsja
— The Times Of India (@timesofindia) March 28, 2023
कर्मचार्यांच्या पी.एफ्. रकमेवर २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.०५ टक्के व्याजदर देण्यात येत होता. आता २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये पी.एफ्.वरील व्याजदर सर्वाधिक ८.७५ टक्के इतके होते. वर्ष २०२१-२२ साठी हे दर ८.१ टक्क्यांपर्यंत न्यून करण्यात आले होते. आता या वर्षी त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.