शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !
|
शामली (उत्तरप्रदेश) – येथील केरटू गावामध्ये गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यास गेलेल्या हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती पथकाच्या पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. या वेळी पोलिसांना मारहाणही करण्यात आली. यात ३ पोलीस घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुसलमानांनी आरोपी जबरूद्दीन याला पोलिसांच्या कह्यातून सोडवून पळून जाण्यास दिले. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. तसेच हिसकावून घेतलेली शस्त्रेही परत मिळवण्यात आली आहेत. एकूण ४० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जबरूद्दीन याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याची माहिती देणार्यास २५ सहस्र रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आलेले आहे.
उत्तर प्रदेश के शामली में एक इनामी बदमाश को पकड़ने गई हरियाणा एसटीएफ की टीम पर ग्रामीणों ने हमला कर दिया.#Shamli #Haryana #UttarPradesh #Crime https://t.co/ptl1tVQSCm
— ABP Ganga (@AbpGanga) March 27, 2023
संपादकीय भूमिकाअशा कायदाद्रोह्यांवर उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! ज्या प्रमाणे गुंड आणि त्यांना साहाय्य करणारे यांची अवैध घरे पाडली जात आहेत, तसेच या लोकांवरही कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते ! |