पुणे येथे ‘अटल भूजल राष्ट्रीय कार्यशाळे’त ७ राज्यांचा सहभाग !
पुणे – केंद्र सरकार पुरस्कृत ‘अटल भूजल योजने’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘अटल भूजल राष्ट्रीय कार्यशाळे’त देशातील ७ राज्यांतील १३५ अधिकार्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत अटल भूजल योजनेशी संबंधित अधिकारी आणि विषयतज्ञ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राज्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग अन् राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था’ येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ७ नद्यांचे ‘जलपूजन’ करून कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला. कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांतील अधिकारी सहभागी झाले होते.
कार्यशाळेमध्ये भूजल उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर यांनी ‘भूजल व्यवस्थापनामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे योगदान, या विभागाच्या वतीने आतापर्यंत राबवण्यात आलेले प्रकल्प आणि नियोजित प्रकल्पाची माहिती दिली.