पुणे येथील टपाल खात्यातील अधिकार्यांकडून २४ लाख रुपयांचा अपहार !
७ जणांविरुद्ध विश्रांतवाडी तसेच विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद
अपहार करणार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
पुणे – टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकार्यांनी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी टपाल खात्यातील अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अपहार प्रकरणात ७ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
आरोपींनी आळंदी रस्त्यावरील दिघी कॅम्प टपाल कार्यालयात एकूण २७४ ठेवीदारांनी गुंतवलेली ९ कोटी ६२ लाख ९८ सहस्र रुपयांची रक्कम स्वीकारली. त्या रक्कमेपोटी १८ लाख ३५ सहस्र ११५ रुपयांची रक्कम धानोरीतील टपाल कार्यालयात जमा केली. या रक्कमेचा अपहार त्यांनी केला. ठेवीदारांच्या बनावट स्वाक्षर्या करून त्यांनी टपाल खात्याची फसवणूक केल्याचे टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.