रंकाळा तलावाच्या सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी ८० लाखांच्या निधीस प्रशासकीय संमती ! – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर – कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षांत दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने निधी संमत करण्यासाठी पाठपुरावा चालू होता. याला यश मिळाले आहे. पर्यटन विभागाकडून रंकाळा तलाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी ४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय संमती आणि निधी वितरणाचा शासन निर्णय झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
या उद्यानात मत्सालय, फुलपाखरू उद्यान, विरंगुळा केंद्र, जैवविविधता उद्यान होणार असून यांच्या निविदा प्रक्रिया लवकरच पार पडणार आहेत.