पुणे येथे दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !
पुणे – सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. महंमद जुबेर शेख असे घायाळ झालेल्याचे नाव आहे. शेख याने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी शादाब शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या समवेत असलेल्या ६ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महंमद शेख नाना पेठेतील एस्.एस्. कार डेकोर येथे कामगार आहे. त्याच्या दुकानाच्या शेजारील रुबी मोटर्स दुकानात आरोपी शादाब शेख हा कामगार आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. शादाब आणि त्याच्या समवेत असलेल्या साथीदारांनी महंमद याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि दुकानातील सामानाची तोडफोड करून ४० सहस्र रुपयांची हानी केली आहे.
संपादकीय भूमिकाक्षुल्लक वादातून हिंसक होणारे उद्दाम वृत्तीचे धर्मांध ! |