विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मंचर येथे हिंदु नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा !
मंचर, २७ मार्च (वार्ता.) – हिंदु नववर्षाच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. २० सहस्र हिंदु बांधव आणि भगिनी या शोभायात्रेत उपस्थित होते. मंचर येथील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला आरंभ झाला. शोभायात्रेत घोडे, उंट यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी आणि मावळ्यांचे पथक तसेच गणपति, इस्कॉनचा राधाकृष्ण, बाबा अमरनाथचे शिवलिंग, भगवान शंकर नंदीवर विराजमान, भवानी माता, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ, गोमाता आदी चित्ररथ, धर्मवीर चंद्रशेखर अण्णा यांचा स्मृतीरथ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्री हनुमान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती, वानर सेना, प्रभु रामचंद्रांची भव्य मूर्ती, ९ फूट उंचीचा महाबली हनुमानाचा जिवंत देखावा, सहभागी ढोल पथके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, तसेच लेखक आणि व्याख्याते शरद पोंक्षे हे शोभायात्रेत उपस्थित होते. सांगता सभेत प्रमुख व्यक्तींनी हिंदु धर्म, संस्कृती, आचार, परंपरा, इतिहास, लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोरक्षण संघटन आदी विषयांवर मार्गदर्शन केले.