तासगाव (जिल्हा सांगली) येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘जीवन संजीवनी’ (कोल्स) प्रशिक्षण !
(कोल्स – Compression Only Life Support (COLS) म्हणजेच हृदय आणि फुफ्फुस यांचे कार्य चालू करणे)
तासगाव (जिल्हा सांगली) – जीवन संजीवनी प्रशिक्षण हे हृदय आणि श् वास बंद पडल्यावर केले जाणारे प्रथमोपचार होय ! आपण सतर्कता बाळगत योग्य ती कृती केल्यास हृदयविकाराचा झटका आलेल्यांचा जीव वाचवणे शक्य आहे, असे मार्गदर्शन तासगाव येथील भूलतज्ञ आधुनिक वैद्या (सौ.) कविता विजय जाधव यांनी केले. त्या ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात बोलत होत्या. हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अचानक येणार्या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘कोल्स’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेक प्रशिक्षणार्थींनी घेतला. या प्रसंगी आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले उपस्थित होत्या.