अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलीची हत्या करणार्याला १०० वर्षांची शिक्षा !
वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या ५ वर्षीय माया पटेल या मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणी जोसफ ली स्मिथ या ३५ वर्षीय व्यक्तीला १०० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यामध्ये ६० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अंतर्भूत असून या कालावधीत त्याला पॅरोलवर (संचित रजेवर) जाण्यासाठी जामीन दिला जाणार नाही.
संबंधित घटना ही मार्च २०२१ मधील असून अमेरिकेतील लुइसियाना प्रांतात स्मिथचे एका व्यक्तीशी भांडण चालू होते. या वेळी स्मिथने रागाच्या भरात त्या व्यक्तीवर बंदूक चालवली; परंतु गोळी त्याला न लागता जवळच खेळत असलेल्या माया पटेल या मुलीच्या डोक्यात घुसली. यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.