परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर घरातील त्रासदायक शक्ती नष्ट होणे
‘५.११.२०२१ या दिवशी रात्रीचे १२ वाजले होते. घराची खिडकी थोडीशी उघडी होती. मी प्रार्थना करून झोपायला जात असतांना ‘काळी (त्रासदायक) शक्ती बाहेरून माझ्या खोलीत वेगाने येत आहे आणि खोलीत सगळीकडे गोल गोल फिरत आहे’, असे मला दिसले. मी पहातच राहिले की, ‘हे सत्य आहे कि खोटे !’ मला काही सुचेना.
त्या वेळी मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना ‘ही जी काळी शक्ती आहे, ती नष्ट होऊ दे’ अशी प्रार्थना केली. तेव्हा ती काळी शक्ती एका मिनिटात नष्ट झाली आणि सर्व वातावरण पहिल्यासारखे झाले. यावरून ‘परम पूज्य गुरुदेव आमची किती काळजी घेतात’, हे लक्षात येते. ‘त्यांची आमच्यावर किती कृपा आहे’, हे दिसून येते.
वरील अनुभूती माझ्याकडून लिहून घेतली, यासाठी मी गुरुदेवांच्या प्रती कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. रेषा उदेश कोरगावकर, म्हापसा, गोवा. (१०.११.२०२१)
|