कॅलिफोर्नियातील शीख गुरुद्वाराबाहेरील गोळीबारात २ जण घायाळ
गोळीबारामागे खलिस्तानी असण्याचा संशय
कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील सॅक्रामँटो भागातील एका शीख गुरुद्वारासमोर झालेल्या गोळीबारात २ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गोळीबारामागे खलिस्तानी समर्थकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत असून गोळीबार करणार्या २ जणांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे; मात्र या गोळीबारामागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
US: कैलिफोर्निया के गुरुद्वारे में सिख परेड से पहले हुई गोलीबारी#California | #Gurudwara | #America https://t.co/9YkNj2YC7v
— Zee News (@ZeeNews) March 27, 2023
संपादकीय भूमिकाभारतात अल्पसंख्यांकांची गळचेपी होत असल्याचा कांगावा करणारी अमेरिका स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि तेथे फुटीरतावादी खलिस्तानवाद्यांचा वाढता उपद्रव यांकडे लक्ष देईल का ? |