(म्हणे) ‘कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यास मुसलमानांना पुन्हा आरक्षण देऊ !’ – काँग्रेस
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने मुसलमानांना मिळणारे ४ टक्के आरक्षण रहित केल्यानंतर काँग्रेसकडून ‘सत्तेवर आल्यास हे आरक्षण पुन्हा देण्यात येईल’ असे आश्वासन देण्यात आले आहे.
Karnataka Election: कांग्रेस का मुस्लिम कार्ड, शिवकुमार बोले- अगर सत्ता में आए तो बहाल करेंगे आरक्षण#KarnatakaElection2023 | #Congress https://t.co/tWHNTkMWvy
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) March 27, 2023
कर्नाटक सरकारच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा राज्यघटनेत कायदा नाही’; मात्र कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी सरकारचा निर्णय घटनाविरोधी असल्याचा दावा केला आहे. ‘आरक्षणाची वाटणी संपत्तीप्रमाणे करता येईल, असे भाजप सरकारला वाटते; मात्र आरक्षण ही संपत्ती नसून अधिकार आहे. अल्पसंख्याक वर्गासाठीचे ४ टक्के आरक्षण संपुष्टात आणून ते मोठ्या समाजाला द्यावे, असे आम्हाला वाटत नाही. अल्पसंख्यांक आमचे भाऊ आणि आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत’, असेही शिवकुमार म्हणाले.
संपादकीय भूमिका
|