मोरेना (मध्यप्रदेश) येथील सेंट मेरी शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडले आक्षेपार्ह साहित्य !
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील मोरेनामध्ये ‘सेंट मेरी’ नावाच्या ख्रिस्ती शाळेतील मुख्याध्यपक फादर डायनोसियस आर्.बी. आणि व्यवस्थापक यांच्या खोल्यांतून विदेशी दारूच्या १९ बाटल्या, महिलांची अंतर्वस्त्रे आणि ‘कंडोम’ची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. शहरातील प्रसिद्ध शाळांपैकी एक असलेल्या या शाळेचा तपासणी दौरा करण्यासाठी बाल संरक्षण आयोगाचे पथक तेथे पोचले होते. तेव्हा या आक्षेपार्ह वस्तू हाती लागल्या. प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. शाळेला टाळे ठोकण्यात आले असून या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे.
स्कूल के प्रिंसिपल के आवास से शराब की बोतलें सहित कई आपत्तिजनक सामग्रियां बरामद#Morena #SaintMarySchool #MadhyaPradesh @vikramsinghjat7https://t.co/Vq36bttHI7
— ABP News (@ABPNews) March 26, 2023
१. तपासणीच्या वेळी मध्यप्रदेशच्या बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या निवेदिता शर्मा आणि जिल्हा शिक्षणाधिकारी ए.के. पाठक उपस्थित होते.
२. कार्रवाईनंतर हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर निषेध आंदोलन केले.
३. या प्रकरणी मुख्याध्यपक फादर डायनोसियस आर्.बी. म्हणाले की, शाळेत दारूच्या बाटल्या कुणा शिक्षकाने आणल्या असतील. कंडोमची पाकिटे कशी आली, याविषयी मला ठाऊक नाही.
शाळेची मान्यता रहित करण्यासाठी अहवाल सादर करणार ! – बाल संरक्षण आयोगयासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना निवेदिता शर्मा म्हणाल्या की, या शाळेत चर्चही असून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले असले, तरी ज्या खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्या ठिकाणी ते नाहीत. तसेच एका व्यक्तीला रहाण्यासाठी ७ खोल्यांची आवश्यकता कशी भासते ? या ठिकाणी १२ पलंग, तसेच स्वयंपाकघरही आहे. येथे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांचे वास्तव्य आहे. या प्रकरणी शाळेची मान्यता रहित करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना आयोग अहवाल सादर करणार आहे. |
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, मिशनरी शाळांचे खरे स्वरूप जाणा ! याआधीही मिशनरी शाळांतील अपप्रकार उजेडात आले आहेत. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा ! |