(कै.) पू. पद्माकर होनप यांचे अंत्यदर्शन आणि दहन विधीच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !
१. अंत्यदर्शनापूर्वी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या खोलीत सूक्ष्मातून गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. खोलीत निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य कार्यरत असल्यामुळे तेथे पुष्कळ थंडावा जाणवला.
आ. खोलीच्या कोपर्यांमध्ये पांढर्या रंगाचे कारंजे उडतांना दिसले. यावरून पू. होनपकाकांच्या खोलीत चैतन्य कार्यरत असल्याचे जाणवले.
इ. (कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या आत्मज्योतीचा प्रकाश त्यांच्या संपूर्ण खोलीत पसरल्यामुळे त्यांची खोली चैतन्याच्या पिवळ्या प्रकाशाने उजळून निघाली होती आणि खोलीत चंदन, कापूर, हीना इत्यादी प्रकारचे दैवी सुगंध येत होते.
२. श्री. निषाद देशमुख यांनी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्यासंदर्भात सांगितलेल्या सूत्रांचे उलगडलेले अध्यात्मशास्त्र !
२ अ. पायापासून कमरेपर्यंत उष्णता जाणवणे : त्यांच्या चरणांतून पाताळाच्या दिशेने देवीची मारक शक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे त्यांच्या पायापासून कमरेपर्यंत उष्णता जाणवली.
२ आ. तळहातांचा स्पर्श शीतल जाणवणे : त्यांच्या तळव्यातून साधकांच्या रक्षणासाठी तारक शक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे त्यांच्या तळहातांचा स्पर्श शीतल जाणवला.
२ इ. (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या विविध प्रकारच्या लहरींचे प्रमाण
टीप – देहत्यागानंतर (कै.) पू. पद्माकर होनप यांच्यातील सगुण तत्त्वाचे प्रमाण न्यून होऊन निर्गुण तत्त्वाचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्याकडून शक्ती आणि भाव यांच्या लहरींचे प्रक्षेपण अल्प प्रमाणात अन् आनंदाच्या लहरींचे प्रमाण अधिक प्रमाणात झाले.
३. (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या दहन विधीच्या संदर्भात सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !
३ अ. चिता यज्ञासमान आणि स्मशानभूमी यज्ञशाळेप्रमाणे असल्याचे जाणवणे : दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले. चितेतील क्रव्याद अग्नी हा यज्ञातील पावक अग्नीप्रमाणे अतिशय पवित्र असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी देवाचा उत्सव चालू असल्याप्रमाणे संपूर्ण वातावरण चैतन्यदायी आणि उत्साही असल्याचे जाणवले.
३ आ. वायूमंडलात धर्मशक्तीच्या केशरी रंगाच्या लहरी प्रक्षेपित होणे : चितेत केशरी रंगाच्या ज्वाला प्रज्वलित झाल्या होत्या. या केशरी रंगाच्या ज्वालांमधून (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या अंत:करणातील धर्मशक्ती वायूमंडलात प्रक्षेपित होऊन वायूमंडलाची शुद्धी करत असल्याचे जाणवले.
३ इ. (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून भावाची निळसर, चैतन्याची पिवळसर, आनंदाची गुलाबी आणि शांतीची पांढरी या रंगांची वलये बाहेर पडून मोठी होऊन नंतर ती वायूमंडलात विरून गेल्यामुळे अंत्यविधीला उपस्थित असणार्या साधकांना विविध प्रकारच्या अनुभूती येणे : त्यानंतर (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून भावाची निळसर, चैतन्याची पिवळसर, आनंदाची गुलाबी आणि शांतीची पांढरी या रंगांची वलये बाहेर पडून मोठी होऊन नंतर ती वायूमंडलात विरून गेली. त्यामुळे भावाच्या वलयामुळे वातावरण प्रथम भावपूर्ण झाले आणि तेथे उपस्थित असणार्या सर्व साधकांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यानंतर चैतन्याच्या वलयामुळे संपूर्ण वातावरणाची शुद्धी झाली. त्यानंतर आनंदाच्या वलयामुळे सभोवतालचे वायूमंडल आनंदी झाले आणि सर्वांत शेवटी सर्वांचे चित्त शांत होऊन त्यांना शांतीची अनुभूती आली.
३ ई. दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिव देहातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे स्मशानभूमीच्या अर्धा ते एक कि.मी. अंतरापर्यंत चैतन्याचे पिवळसर रंगाचे रिंगण निर्माण होणे : दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिव देहातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे स्मशानभूमीच्या अर्धा ते एक कि.मी. अंतरापर्यंत चैतन्याचे पिवळसर रंगाचे रिंगण निर्माण झाले होते. या रिंगणामुळे अनिष्ट शक्तींना स्मशानभूमीत प्रवेश करता आला नाही. त्याचप्रमाणे अंत्यसंस्कारविधीला उपस्थित असणारे (कै.) पू. पद्माकर होनप यांचे नातेवाईक, साधक आणि पुरोहित यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण झाल्यामुळे त्यांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण झाले.
कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला आश्रमातील एका खोलीत राहून (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या मृत्यूत्तर स्थितीचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा लाभली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२२)
|