(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी पू. होनपकाका यांच्या बाजूच्या आसंदीत बसल्यावर आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याशी झालेला भावसंवाद !
१ अ. पू. होनपकाका यांच्या बाजूच्या आसंदीत बसल्यावर त्यांच्याकडून आनंद आणि प्रीती यांची स्पंदने येणे अन् अनाहतचक्र आणि आज्ञाचक्र यांवर संवेदना जाणवणे : ‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना घेऊन आश्रमाच्या पुढच्या बाजूला आसंदीवर बसले होते. त्या वेळी तिथे पू. होनपकाका आणि अन्य संतही उपस्थित होते. मी पू. वामन यांना घेऊन पू. होनपकाका यांच्या बाजूला बसले होते. त्या वेळी पू. काकांकडून आनंद आणि प्रीती यांची पुष्कळ स्पंदने माझ्याकडे येत होती. त्यामुळे मला स्वतःचे अनाहतचक्र आणि आज्ञाचक्र यांवर संवेदना जाणवत होत्या. मला आतून आनंदाच्या उकळ्या फुटल्याप्रमाणे जाणवत होते.
१ आ. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रथोत्सवानिमित्त वातावरणात प्रक्षेपित होणारी आनंदाची स्पंदने आणि पू. होनपकाका यांच्या बाजूला बसल्यावर अनुभवलेली आनंदाची स्पंदने ! : त्यानंतर मी काही वेळाने पू. काकांपासून काही अंतर दूर जाऊन बघितले. तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रथोत्सवानिमित्त वातावरणात प्रक्षेपित होणारी आनंदाची स्पंदने मला जाणवून माझी भावजागृती होत होती. ‘पू. होनपकाका यांच्या बाजूला बसल्यावर अनुभवलेली आनंदाची अवस्था वेगळी आहे’, असे माझ्या लक्षात आले.
१ इ. मी पू. होनपकाकांना याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् भगवंत असल्याने त्यांच्यामुळे अनुभवता येणारा आनंद वेगळ्या स्तराचा आहे. संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात आणि प्रत्येक संतांच्या साधना मार्गाप्रमाणे स्पंदने पालटतात. शेवटी संतही ईश्वराचे अंश असतात ना; म्हणून आनंद मिळतो.’’
१ ई. ते पुढे म्हणाले, ‘‘हे पुष्कळ छान आहे. तू जे अनुभवलेस, ते सर्वांना अनुभवता येत नाही. आपली तशी सिद्धता असल्यावर देव अनुभूतींमधून शिकवतो. तू चांगले निरीक्षण केलेस. ‘पू. वामन तुझा पुत्र म्हणून जन्माला का आले आहेत ?’, हे तुझ्या लक्षात आले का ? प.पू. गुरुदेवांनी तुला वरदानच दिले आहे.’’
२. पू. होनपकाका यांची भेट झाल्यावर त्यांनी प्रेमाने विचारपूस करणे
पू. काका जेव्हा आश्रमात भेटायचे, तेव्हा मला प्रेमाने विचारायचे, ‘‘तू बरी आहेस ना ? आनंदात रहा.’’ ते पू. वामन यांना विचारायचे, ‘‘कोणता नामजप चालू आहे ?’’ त्या वेळी पू. वामन त्यांचा जो नामजप चालू असेल, तो सांगायचे. त्यावर पू. काका ‘छान छान’, असे म्हणायचे.
‘पू. काकांचा अनमोल सत्संग लाभला’, ही केवळ प.पू. गुरुदेवांची कृपा आहे. त्यासाठी प.पू. गुरुदेव आणि पू. होनपकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (३१.१०.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |