वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अजितसिंह बग्गा यांची वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष आणि ‘जनउद्योग व्यापारी मंडळा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा यांनी वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. आश्रमातील कार्याची माहिती करून घेतल्यानंतर ते म्हणाले, ‘‘येथे सर्वकाही अतिशय व्यवस्थित आहे. येथे प्रत्येकाला कसे जगायचे आणि वागायचे ? हे शिकायला मिळते.’’ साधकांच्या त्यागाचेही त्यांनी कौतुक केले. ‘वाराणसीतील ५० व्यावसायिकांना आश्रम बघण्यासाठी आणणार आहे’, असे त्यांनी सांगितले. या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचीही वंदनीय उपस्थिती होती. श्री. बग्गा यांचा सद्गुरु सिंगबाळ यांच्याविषयी पुष्कळ आदरभाव आहे. त्यांनी सद्गुरु सिंगबाळ यांना त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.