मशीद आणि दर्गा यांच्या जागांवरील अतिक्रमणाविषयी मोजणी करून हद्द निश्चित करणार ! – मंत्री शंभूराज देसाई
(दर्गा म्हणजे फकिराचे थडगे असलेले ठिकाण)
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – मशीद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारती यांचे अतिक्रमण झालेले नाही. मशीद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये मशिदींच्या हद्दीजवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी २६ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. सदस्य अबू आजमी यांनी याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. ‘नगर शहरातील मशीद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालयाचे अतिक्रमण झालेले नाही’, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.