आंदोलकांवरील कारवाईअभावी विरोधकांचा सभात्याग !
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – २ दिवसांपूर्वी विधानभवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली होती; परंतु अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आंदोलन करणार्या आमदारांवर कोणतीही कारवाई केली नसल्याच्या कारणावरून विरोधी पक्षातील आमदारांनी २५ मार्च या दिवशी सभात्याग केला.