मविआच्या आमदारांचे काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन !
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भात २५ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने कामकाज चालू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांतील आमदारांनी हे आंदोलन केले.