जम्मू-काश्मीर जिहादी कारवायांमध्ये केव्हापर्यंत जळत रहाणार ?
१. आतंकवाद्यांची घुसखोरीही भारताला लज्जास्पद !
आज देशाचा प्रत्येक नागरिक पाकिस्तानी आणि त्यांच्या छुप्यादूतांच्या आक्रमणांमुळे अत्यंत दुःखी आहे. मागील काही वर्षांपासून हे जिहादी आपले सैन्य आणि पोलीस चौक्या यांना लक्ष्य बनवून त्यांची निःसंकोचपणे हानी करत आहेत. उदा. मागील २-३ वर्षांमध्ये मुख्य स्वरूपात दीनानगर ठाणे, गुरुदासपूर (२७.७.२०१५) बी.एस्.एफ्.ची (भारतीय सीमा सुरक्षा दलाची) छावणी, उधमपूर (५.८.२०१५), पठाणकोट एअरबस (३.१.२०१६), उरी सेना ब्रिगेड मुख्यालय (१८.९.२०१६), जम्मूमधील नगरोटा सैन्य छावणी आणि रामगडमध्ये बी.एस्.एफ्. (२६.११.२०१६) मध्ये झालेल्या आक्रमणांच्या व्यतिरिक्त जवळ जवळ प्रतिदिन या क्षेत्रांमध्ये होणार्या अन्य आतंकवादी कारवाया इत्यादी याचे प्रमाण आहेत. या व्यतिरिक्त सीमेवर प्रतिवर्ष शेकडो वेळा होणारे युद्धविरामाचे उल्लंघन आणि आतंकवाद्यांची घुसखोरी सुद्धा आम्हाला लज्जास्पद ठरत आली आहे.
२. शत्रूंचा संपूर्ण बिमोड होईपर्यंत भारताला आक्रमक नीती पुनःपुन्हा अवलंबणे नितांत आवश्यक !
आता आपण विचार करायला पाहिजे की, २६.९.२०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईकद्वारे शत्रूच्या लॉचिंग पॅडवर आपल्या अद्भुत साहसी रणनीतीचा परिचय देणारे आमचे शूरवीर सैनिक आता केव्हापर्यंत धैर्य टिकवून ठेवतील ? आज सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे आतंकवादी यांच्यामध्ये भारतीय सेनेच्या या आक्रमक नीतीचे कसलेही भय राहिले नाही; म्हणूनच ते पुनःपुन्हा आपल्या क्षेत्रामध्ये अकारण आक्रमण करत रहाणार्या आपल्या जिहादी नीतीमध्ये कसलेच पालट करत नाहीत. अशा स्थितीत जेव्हा आमचे सैनिक आणि सर्व नागरिक शत्रूच्या कुटील कारवायांमध्ये मृत्यूमुखी पडत चालले आहेत, तर अशा शत्रूंचा प्रतिशोध घेण्यासाठी कोणत्या तरी आक्रमक नीतीचा आम्हाला पुनःःपुन्हा अवलंब केलाच पाहिजे. आम्ही पाकिस्तानी सैन्य आणि आय.एस्.आय यांची षड्यंत्रे अन् हाफिज सईद अन् अजहर मसूद इत्यादी आतंकवाद्यांचे म्होरके यांच्या जिहादी संकल्पाला का समजून घेऊ शकत नाही ? जिहादी कारवाया नष्ट केल्याविना राष्ट्ररक्षण कसे होणार ?
(साभार : साप्ताहिक हिंदू सभा वार्ता)