सर्वांचा समान विचार करणारी व्यवस्था हवी ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव
हिंदूंनो, ही सेक्युलर (निधर्मी) व्यवस्था असून ती हिंदूंना सावत्र मुलाप्रमाणे वागवणारी आहे. त्यामुळे सत्तेवर पक्ष कोणत्याही विचारांचा आला, तरी प्रशासकीय व्यवस्था जोवर सेक्युलरच्या नावाखाली हिंदुविरोधी असेल, तोवर असेच चालू राहील. त्यामुळे सर्वांचा समान विचार करणारी म्हणजेच आदर्श रामराज्यासारखी व्यवस्था बनवण्यासाठी आपण पुरुषार्थ करणे (हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हा पुरुषार्थ), हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. (१९.२.२०२३)