विशाळगडावरील अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयातून मिळवलेली स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अधिवक्त्यांची नेमणूक करा ! – नितीन शिंदे यांचे वनमंत्र्यांना निवेदन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना निवेदन देतांना श्री. नितीन शिंदे (उजवीकडे)

मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमणधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने अतिक्रमण काढण्यास तात्पुरता मनाई आदेश दिला आहे. तरी या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने चांगल्या अधिवक्त्यांची नेमणूक करून तो मनाई आदेश उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. हा मनाई आदेश उठताच अतिक्रमणधारकांना अधिक वेळ न देता विशाळगडावरील सर्व अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करावे, अशी मागणी श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.