वक्फ कायदा त्वरित रहित करावा, या मगणीसाठी बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
बेळगाव, २४ मार्च (वार्ता.) – ‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. बेळगाव येथील आनंदवाडी आणि हिंदवाडीतील काही भागांतील एकूण ४५ हिंदूंच्या भूमी (एकूण ५ सर्वे नंबर्स) वक्फ बोर्डाकडून बळकावल्या गेल्या आहेत. अशाच प्रकारे बेळगाव येथील अन्य भागांतीलही हिंदूंची भूमी वक्फ बोर्डाकडून बळकावण्यात आली आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे बेळगाव जिल्हा समन्वयक श्री. ऋषीकेश गुर्जर यांनी केली. २४ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि विविध समविचारी संघटना यांच्या वतीने येथील कोर्ट कंपाऊंड डी.सी. ऑफिस (जिल्हाधिकारी कार्यालय) या ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री. परगी यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनामध्ये श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रवि कोकितकर, हमारा देश संघटनेचे श्री. देवदत्त मांजरेकर, तसेच श्री. मल्लिकार्जुन कोकणे, श्री. भूषण रेवणकर, आनंदवाडी येथील रहिवासी सर्वश्री प्रभाकर पोळ, रवींद्र चिंचनेकर, प्रताप श्रेयस्कर, बंडू पाटील, मारुति श्रेयस्कर, प्रकाश एकबोटे, सदानंद मासेकर, तसेच ज्योती अंसुरकर, शशिकला पोळ, सौ. नयन गोरल, सौ. सविता गणेशन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय नंदगडकर, श्री. सुधीर हेरेकर यांसह ४० जण उपस्थित होते.