कृष्णविवरातील प्रखर झोतामुळे दीर्घिकेला आकार प्राप्त ! – आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्ष
पुणे – पृथ्वीपासून १.३ अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेल्या ‘टीकप’ नामक दीर्घिकेच्या केंद्रकात असलेल्या कृष्णविवरातून निघणार्या प्रखर झोतामुळे दिर्घिकेला आकार प्राप्त झाल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे. चिली देशातील अटकाम लार्ज मिलिमीटर अरे (अल्मा) दुर्बिणच्या साहाय्याने केलेल्या या संशोधनाचा शोधनिबंध ‘द जर्नल ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनाची माहिती ‘आयुका’ने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली. या संशोधनामुळे सक्रीय दीर्घिकीय केंद्राच्या वर्तनाचे नवे आकलन जगासमोर आले आहे. दीर्घिकेच्या निर्मितीमध्ये जेट्सची (प्रखर झोताची) भूमिका महत्त्वाची ठरते.
‘टीकप’ दीर्घिके संदर्भातील निष्कर्ष
१. लहान रेडिओ जेट्सचा दीर्घिकेवर फार परिणाम होत नसल्याचे आजवर मानले जात होते; मात्र शांत दिसणार्या दीर्घिकेत रेडिओ जेट्समुळे तारा निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
२. रेडिओ जेट्सच्या दोन्ही टोकांच्या दिशेने परिणाम होण्याऐवजी काटकोनात लंबकार परिणाम दिसत आहे.