घराची विक्री करत असतांना आलेले अनुभव आणि झालेले त्रास
१. घरविक्री करण्याविषयीचे दैनिक सनातन प्रभातमधील विज्ञापन वाचून अन्य धर्मीय व्यक्ती चौकशीसाठी घरी येणे
घराची विक्री करण्याचे ठरवल्यावर त्यादृष्टीने दैनिक सनातन प्रभातमध्ये विज्ञापन (जाहिरात) देणे आणि संबंधित व्यक्तींना कळवणे इत्यादी करण्यास प्रारंभ केला. प्रथम घर घेण्यासाठी बाबांच्या मित्राच्या ओळखीने स्थानिक अन्य धर्मीय व्यक्ती आमच्याकडे आली. प्रथम ती व्यक्ती अन्य धर्मीय आहे, हे आम्हाला कळले नाही; पण तिच्या एकूणच दिसण्यावरून ती व्यक्ती चांगली नाही, असे आम्हाला वाटले.
२. अन्य धर्मीय व्यक्तींना घर विकणार नसल्याचे सांगितल्यावर आलेल्या व्यक्तीने अन्य धर्मीय कसे चांगले असतात, हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे
त्या व्यक्तीने घराचे कागदपत्र मागितल्यावर मी त्या व्यक्तीला कागदपत्र व्हॉट्सअॅप करण्याच्या दृष्टीने तिचे नाव आणि संपर्क क्रमांक मागितला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव बबलू, असे सांगितले. तिने कुठल्या प्रकारच्या लोकांना घर विकायचे आहे, असे आम्हाला विचारले, उदा. ब्राह्मण, मराठा, मारवाडी इत्यादी. मग आम्ही त्या व्यक्तीला सांगितले, अन्य धर्मीय सोडून कुठल्याही व्यक्तीला विकण्यास हरकत नाही. असे सांगितल्यावर त्या व्यक्तीने आम्हाला अन्य धर्मीय किती चांगले असतात, हे काही उदाहरणे देऊन पटवून दिले.
३. संपर्क क्रमांक विचारल्यावर टाळाटाळ करणे
नंतर त्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक मागतांना ती व्यक्ती आडनाव सांगायला टाळाटाळ करू लागली. नंतर आडनाव सांगण्याबद्दल विनंती केल्यावर तिने तिचे आडनाव सांगितले. (आडनावावरून ती व्यक्ती अन्य धर्मीय असल्याचे लक्षात आले.) वरील उदाहरणावरून ती व्यक्ती अयोग्य असल्याचे देवाने आमच्या लक्षात आणून दिले आणि अयोग्य व्यक्तीच्या हाती घर विकण्यापासून आम्हाला वाचवले.
४. २० वर्षांपूर्वी २ टक्के इतकी संख्या असणार्या अन्य धर्मियांची सध्याची संख्या ३० टक्के इतकी वाढणे
काही दिवसानंतर आम्हाला एका जवळच्या व्यक्तीकडून कळले की, आमच्या भागात अन्य धर्मियांची घरे जवळपास तीस टक्के झाली आहेत. १५ ते २० वर्षांपूर्वी ही संख्या २ टक्के होती. घर विकण्याच्या संदर्भात विज्ञापन दिल्यावर संपर्कात येणार्या व्यक्तींना भेटल्यावर ते लोक चांगले नसल्याचे अन्यांकडून लक्षात यायचे. आपत्काळाच्या दृष्टीने घर साधकांना किंवा सात्त्विक व्यक्तीला विकले जावे, अशी आमची मनापासून इच्छा होती; पण तशाप्रकारे कुठलीही व्यक्ती घर विकण्यासाठी मिळत नव्हती.
५. घराच्या विक्रीच्या संदर्भातील व्यवहार होण्याच्या दोन दिवस आधी घरावर दिव्यात्मे आले आहेत, असे जाणवणे
घराची विक्री लवकरात लवकर करून सात्त्विक आणि योग्य व्यक्तीलाच घर विकणे, हा भाग त्या वेळच्या वर्तमान परिस्थितीनुसार कठीण वाटत होता. आध्यात्मिक स्तरावरील उपाय, भगवंताला शरण जाणे आणि संतांचे मार्गदर्शन इत्यादींमुळे घराची विक्री लवकर अन् योग्य व्यक्तीला झाली. घराच्या विक्री संदर्भातील व्यवहार होण्याच्या दोन दिवस आधी आमच्या घरावर दिव्यात्मे आल्याचे मला जाणवले. ही अनुभूती आल्यानंतर केवळ दोन दिवसांत योग्य व्यक्तीला संपर्क होऊन घर विक्रीचा व्यवहार निश्चित झाला.
परम कृपाळू गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे सर्व निर्विघ्नपणे पार पडले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
श्री. अमित विजय डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |