छत्रपती संभाजीनगर नामांतराचे समर्थन करा !
महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले. अनेक जणांच्या विरोधानंतर आणि अनेक वर्षे रखडत असलेला विषय नामांतराने पूर्ण झाल्यामुळे हिंदूंना आनंद झाला होता; परंतु हिंदूंच्या या आनंदावर विरजण घालणार नाहीत, तर ते धर्मांध कसले ? त्यामुळे नामांतर झालेले असूनही त्याला विरोध कायमच आहे. अजूनही हा विषय धगधगतच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने जनतेला २७ मार्चपर्यंत नामांतराविषयीचे आक्षेप सरकारी कार्यालयात नोंदवायला सांगितले आहेत. हा आक्षेप नोंदवण्यातील अर्जांची संख्या २३ मार्चपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ ४५०, तर विरोधात ७० सहस्रांहून अधिक अर्ज आलेले आहेत.
ही संख्या वाचल्यानंतर हिंदूंनी किती जागृत व्हायला हवे, हे लक्षात येते. संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी लोकसंख्या ६८ टक्के हिंदु आणि २१ टक्के मुसलमान अशी आहे. असे असतांना आक्षेप नोंदवण्याच्या अर्जांची संख्या पाहिल्यास विरोधातील अर्जांची संख्या अधिक आहे. यातून हिंदू झोपलेले आहेत, असे म्हणायचे का ? काही हिंदूंना वाटत असेल, संभाजीनगर नाव झाले किंवा नाही, तरी काय फरक पडतो ? येथे लक्षात घेण्याचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे ज्या मोगलांनी भारतावर ७०० वर्षे राज्य केेले, त्यानंतर इंग्रजांनी १५० वर्षे केले आणि भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होऊन गेली, तरी मोगलांच्या नावांच्या खुणा देशात अजूनही का आहेत ? अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती एकत्र असते. त्यानुसार नावासमवेत त्याची शक्तीही कार्यरत असते. त्यामुळे नावात काय ?, असा विचार न करता मोगलांची मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी नामांतर होणे आवश्यक आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रखर हिंदु धर्माभिमान सर्वांना थक्क करणारा होता. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतर करावे, यासाठी त्यांच्यावर आपण कल्पनाही करू शकणार नाही, असे अनन्वित अत्याचार औरंगजेबाने केले होते. असे असूनही त्यांनी महान हिंदु धर्म सोडला नाही. हा इतिहास तरुण पिढीसमोर येणे आवश्यक आहे. यातून प्रेरणा घेण्यासाठी औरंगाबाद शहराचेच नव्हे, तर जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर होणे आवश्यक आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व हिंदूंनी छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ सरकारी कार्यालयांमध्ये त्वरित आक्षेप नोंदवावेत ! संघटित प्रयत्नांना नेहमीच यश येते !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.