ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार !
पुणे – ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाविषयी ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरणार्या बालशिवाजीची प्रतिकृती, श्री कसबा गणपति आणि श्री तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतीचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाश माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्काराचे यंदा ३३ वे वर्ष आहे. जुलैमध्ये होणार्या कार्यक्रमात डॉ. आगाशे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.