छत्रपती संभाजीनगर नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !
छत्रपती संभाजीनगर – शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र २४ मार्च या दिवशी न्यायालयाने ही याचिका फेटाळली. २७ मार्च या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने ही याचिका ऐकून घेणार नाही, असे याचिका फेटाळतांना खंडपिठाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती पी.एस्. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपिठाच्या समक्ष याचिका सूचीबद्ध करण्यात आली होती.
औरंगाबाद शहराचे नाव पालटून छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या ४ मार्च २०२० च्या पत्राला केंद्र तसेच राज्य सरकारने दिलेल्या संमतीला याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. २४ मार्च या दिवशी सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ अधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय
२७ मार्च २०२३ या दिवशी सुनावणी होेणार आहे, असे खंडपिठाच्या लक्षात आणून दिल्यावर याचिका स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला.