‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’चे संचालक असलेल्या अर्हाना बंधूंची ४७ कोटी रुपयांची मालमत्ता शासनाधीन !
पुणे – कॅम्प येथील ‘रोझरी एज्युकेशन ग्रुप’चे संचालक विनय अर्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अर्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शासनाधीन केली. यामध्ये रोझरी शाळेची इमारत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे. विनय अर्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बँकेकडून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले होते; मात्र ही रक्कम घेऊन ती नूतनीकरणासाठी न वापरता तिचा अपहार केला अशी तक्रार बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली होती. या माहितीच्या आधारे अर्हाना बंधूंविरोधात गुन्हा नोंद झाला होता. ईडीच्या अधिकार्यांनी २८ जानेवारी या दिवशी त्यांच्या मालमत्तेवर धाड टाकून त्यांची चौकशी केली. त्यानंतर ‘ईडी’ने १० मार्च या दिवशी विनय अर्हाना यांना कह्यात घेतले. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांची २० मार्चपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत रवानगी केली. अर्हाना बंधूंच्या शासनाधीन केलेल्या मालमत्तेचे बाजार मूल्य ९८ कोटी २० लाख रुपये आहे, अशी माहिती ‘ईडी’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
संपादकीय भूमिकाशाळेच्या नूतनीकरणासाठी घेतलेल्या कर्जाचा अपहार होणे, हे दुर्दैवी आहे. असे संचालक असलेल्या शाळेत मुलांवर कसले संस्कार होणार ? |