पिंपरी (पुणे) येथे पगार मागितल्याने सफाई करणार्या महिलेला धर्मांधाकडून बेदम मारहाण !
पिंपरी (पुणे) – येथील ‘सिटी प्राईड’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ‘ट्रान्सपोर्ट’ कार्यालयामध्ये साफसफाई करणार्या ४० वर्षीय महिलेने पगार मागितला; म्हणून हर्षद खान याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसत आहे. निगडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. यामुळे पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. निगडी पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी खान याला कह्यात घेतले आहे.
ट्रान्सपोर्ट कार्यालयामध्ये काम करणार्या खानने गेल्या ३ मासांपासून महिलेला पगार दिला नाही. पगार देण्यास तो टाळाटाळ करीत होता. सदर महिलेने खानला पगार मागितला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा राग धरून खान याने सदर महिलेला बेदम मारहाण केली.
संपादकीय भूमिका‘चोर तो चोर वर शिरजोर’, ही आहे धर्मांधांची मानसिकता ! अशा धर्मांधांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवा ! |