राज ठाकरे यांच्या विरोधात धर्मांधाकडून तक्रार प्रविष्ट !
राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याविषयी आवाज उठवल्याचे प्रकरण
#पाडवा_मेळावा #राजठाकरे #RajThackeray pic.twitter.com/xMbYfSVpwv
— Raj Thackeray (@RajThackeray) March 23, 2023
पुणे – गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत २२ मार्च या दिवशी शिवाजी पार्कवर मनसेचा ‘पाडवा मेळावा’ पार पडला. या वेळी राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याविषयी आवाज उठवला होता. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचे मंदिर बांधू, अशी चेतावणी त्यांनी दिली होती, तसेच सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचे सूत्रही उपस्थित केले होते. यावरून राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात वाजीद सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकाअनधिकृत दर्ग्याविषयी सूत्रे उपस्थित केल्यावर तक्रार प्रविष्ट करणारे मुसलमानांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाविषयी मात्र काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशी सतर्कता हिंदूंनीही स्वतःमध्ये निर्माण करून धर्मांधांच्या अयोग्य कृतींच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट करायला हव्यात ! |