सध्या वक्फ बोर्डाकडे ८ लाख ६० सहस्र एकरहून अधिक भूमी ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
सातारा, २३ मार्च (वार्ता.) – हलाल जिहादप्रमाणे मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडून लँड जिहादचा प्रकार चालू आहे. वक्फ बोर्डाला कायद्याने हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराच्या जोरावर वक्फ बोर्डाने देशासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हिंदूंची अशी भूमी गिळंकृत केली आहे. वर्ष २००९ मध्ये वक्फ बोर्डाकडे असलेली ४ लाख एकर भूमी सध्या ८ लाख ६० सहस्र एकरहून अधिक झाली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी दिली. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, कार्यकारणी सदस्य उमेशजी गांधी, विश्व हिंदु परिषदेचे माजी सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, लिंगायत वाणी समाजाचे श्री. जंगम स्वामी, श्रीबहुलेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमोल गोसावी आदी उपस्थित होते.
या वेळी श्रीबहुलेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमोल गोसावी यांनी श्रीबहुलेश्वर मंदिराची भूमी हडप केलेल्या व्यक्तींविरुद्ध न्यायालयीन लढा कसा दिला ? याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.