मदुराई (तमिळनाडू) येथील साधिका सौ. एम्.व्ही. कार्तिगेयिनी यांना आलेल्या अनुभूती
१. शांत झोप येण्यासाठी निद्रादेवीला प्रार्थना केल्यावर मुलाच्या झोपण्याच्या सवयीत सकारात्मक पालट होणे
‘माझा २ वर्षांचा मुलगा कु. रक्षित वर्षण कधीच गाढ झोपत नाही. मागील आठवड्यात मी सेवा करत असतांनाही तो झोपत नव्हता. परात्पर गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेनेच ‘शांत झोप येण्यासाठी निद्रादेवीला प्रार्थना करणे’, याविषयीचा एक लेख माझ्या वाचण्यात आला. रक्षितला शांत झोप येण्यासाठी मी निद्रादेवीला प्रार्थना केली. त्यानंतर कोणताही अडथळा न येता तो शांत झोपला. दुसर्या दिवशीही मी प्रार्थना करून त्याला झोपवले असता तो शांत झोपला. देवाच्या कृपेमुळे प्रार्थनेने त्याच्या झोपण्याच्या सवयीत सकारात्मक पालट झाला आहे. ‘हे सर्व सेवेमुळेच झाले’, असे मला वाटते; कारण मी सेवा करत नसते, तर कदाचित् संकेतस्थळावरील त्या लेखाविषयी मला कधी कळलेच नसते.
२. अग्निहोत्र केल्यावर काही दिवसांतच मुलाने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास आरंभ करणे
माझी बहीण श्रीमती व्ही. कलाइवेणी हिने मला अग्निहोत्र करण्याचे महत्त्व सांगितले आणि मी मे २०२१ पासून अग्निहोत्र करण्यास आरंभ केला. ऑक्टोबर २०२१ मध्ये आमच्या घराचे नूतनीकरण करण्याचे काम २ मास चालू होते. या कालावधीत मी अग्निहोत्र केले नाही. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये एका सत्संगात अग्निहोत्र केल्याने होणार्या लाभांविषयी ऐकले आणि मी पुन्हा अग्निहोत्र करण्यास आरंभ केला. त्यानंतर ४ दिवसांतच रक्षितने प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास आरंभ केला.
मला वरील अनुभूती दिल्याबद्दल मी श्री दत्तगुरु आणि परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. एम्.व्ही. कार्तिगेयिनी (वय ३९ वर्षे), मदुराई, तमिळनाडू. (२१.२.२०२२)
|