वर्ष २०२४ पूर्वी समान नागरी कायदा लागू करा ! – योगऋषी बाबा रामदेव यांची मागणी
हरिद्वार – समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी योगऋषी रामदेवबाबा यांनी मोदी सरकारकडे केली आहे. ‘हे कायदे वर्ष २०२४ पूर्वी होतील’, अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून केली आहे. येथे ९ दिवस चालणार्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
2024 से पहले बने समान नागरिक संहिता, जनसंख्या कानून भी बने: रामदेव#babaramdev #UniformCivilCode #PopulationControlLawhttps://t.co/fyuvChg4Cm
— Hindustan (@Live_Hindustan) March 23, 2023
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे. भारतात जे रामविरोधी, देशद्रोही आहेत, त्यांच्यात खळबळ उडाली आहे; कारण आता श्रीराममंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल.
ऋषीग्राममध्ये ६० तरुण आणि ४० तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. योगऋषी रामदेवबाबा सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत. त्याचसमवेत उत्सवात ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती रामदेवबाबा यांनी दिली.