श्री साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी आलेल्या प्रस्तावांना दिलेले उत्तर
मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – शिर्डी येथील श्री साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करावे, असे प्रस्ताव आले होते. त्यांपैकी ६३५ कर्मचार्यांना यापूर्वी सेवेत कायम केले आहे. आस्थापना व्यय १० टक्क्यांच्या आत असेल, तर आपण कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करू शकतो; परंतु आता आस्थापना व्यय जवळपास २१ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे याविषयी कायदेशीर गोष्टी पडताळण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिले.