मोगलांचे उदात्तीकरण करणार्या‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’या वेब सिरीजवर बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर अकबर आणि त्याच्या परिवाराचे, म्हणजेच मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर बंदी घालावी, तसेच हिंदु-मुसलमानांमध्ये धार्मिक भेदभाव करणार्या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालावी, या मागण्यांसाठी येथील शास्त्री घाट येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात ‘वाराणसी व्यापार मंडळा’चे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा, मंडळाचे महामंत्री श्री. कविंद्र जयस्वाल, मंत्री श्री. संजय केसरी, माध्यम प्रभारी डॉ. रमेश दत्त पांडे, ‘आदिमहादेव काशी धर्मालय मुक्ती न्यासा’चे प्रबंध ट्रस्टी डॉ. रामप्रसाद सिंह, ‘केंद्रीय ब्राह्मण महासभे’चे श्री. मनीष कुमार शर्मा, ‘पांडेयपूर व्यापार मंडळा’चे श्री. गोपाल दास गुप्ता, दैनिक ‘हिंदुुस्थान समाचार’चे श्री. संजय शुक्ला, ‘ऑटो युनियन’चे अध्यक्ष श्री. ईश्वर सिंह, ‘हिंदु समाज पार्टी’चे श्री. शुभम पांडे, ‘महावीर सेने’चे श्री. अरविंद गुप्ता, ‘हनुमान चालीसा मंडळा’चे श्री. सुमित सराफ, ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. राजन केसरी, अन्य राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी उपस्थित होते.