देवघरातील शोभिवंत देवाला पहातांना कोणतेही भान न रहाणे

सौ. स्वाती शिंदे

‘माझ्‍या अंतरात नित्‍य वसलेल्‍या देवाला मी सातत्‍याने अनुभवू शकत नाही; कारण त्‍याला पहाण्‍यासाठी मी सातत्‍याने भावाच्‍या स्‍थितीत नसते. माझी भावदृष्‍टी असतांना मात्र मी त्‍याला निश्‍चितपणे अनुभवू शकते. जसे देवघरातील देव मला अंधारात दिसत नाही; मात्र तिथे तेवणारे निरांजन आणि समई यांच्‍या प्रकाशात मात्र तो फारच शोभिवंत अन् मोहक दिसतो. जेव्‍हा मी ते दृश्‍य पहाते, तेव्‍हा काही क्षण मला आजूबाजूचे भान रहात नाही. हे विचार चालू असतांना खालील ओळी सुचल्‍या.

अंतरात या भावज्‍योती प्रज्‍वलित होता ।

आनंदून जाईल मन हे माझे, तुझे मोहक रूप न्‍याहाळता ॥ १ ॥

विसरेन मी स्‍वतःला तुला पहाता ।

हेच दान द्यावे या अज्ञानी जिवा आता ॥ २ ॥

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक