सोलापूर येथे ‘मूक पदयात्रे’त ६०० धारकरी उपस्थित !
सोलापूर, २२ मार्च (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्त सोलापूर येथे मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत ६०० धारकरी सहभागी झाले होते. शिवस्मारक येथे मशाल आणि भगवा ध्वज यांचे पूजन अन् ‘श्री संभाजीसूर्यहृदय श्लोक’ म्हणून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. भागवत चाळ, पत्रा तालीम, चौपाड, दत्त चौक, सावरकर मैदान, सुभाष चौक, नवी पेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक येथील पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली. या वेळी धारकरी श्री. वैभव कुलकर्णी यांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मूकपदयात्रेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके आणि श्री. दत्तात्रय पिसे हेही सहभागी झाले होते.