महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !
मुंबई – कोरोना महामारीनंतर या वर्षी राज्यांतील विविध शहरांत निघालेल्या शोभायांत्रांच्या माध्यमातून हिंदूंनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहात केले. लेझिम, ढोल-ताशे, शस्त्र चालवण्याची प्रात्यक्षिके, पारंपरिक वेशभूषेतील उत्साहमूर्ती हे प्रतीवर्षीप्रमाणे या वर्षीही शोभायांत्रांमध्ये पहायला मिळाले. याखेरीज यंदा ‘विविध विषयांवर प्रबोधन करणारे फलक’ हे शोभायात्रांचे वैशिष्ट्य ठरले. अनेक ठिकाणी अतिशय उंच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. महिलांचा सहभाग सर्वच ठिकाणी अधिक होता.
१. मुंबई
दादर आणि गिरगाव येथे भव्य शोभायात्रा निघाल्या. यंदाच्या शोभायात्रेत वैशिष्ट्यपूर्ण लिखाण असलेले फलक हातात धरण्यात आले होते. ‘महाराजांसारखे दिसायला आवडतं; पण त्यांच्यासारखं वागायला कधी शिकणार ?’ असा फलक एकाने हातात धरला होता, तर ‘चित्रपटगृहात इतिहास पहायला आवडतो; तोच इतिहास वाचायला आणि जपायला का आवडत नाही ?’, तसेच स्वामी विवेकानंदांच्या ‘उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका’, अशा विविध फलकांद्वारे मुंबईकरांचे प्रबोधन करण्यात आले. गिरगावच्या शोभायात्रेतील चैत्र नवरात्रीनिमित्ताने बसवलेली देवीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेणारी ठरली. गिरगावमदील महिलांची ‘बुलेट रॅली’ वैशिष्ट्यपूर्ण असते. या वर्षीही येथे तोच उत्साह कायम होता.
#चैत्रशुक्ल #गुढीपाडवा #हिंदू_नववर्ष निमित्त #गिरगाव शोभायात्रेत @HinduJagrutiOrg च्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम सादर करण्यात आला यात हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही आज काळाची गरज आहे याविषयी विविध स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके, फलकांद्वारे प्रबोधन करण्यात आले. pic.twitter.com/zkpbly6YPu
— HJS Mumbai (@HJSMumbai) March 22, 2023
२. नवी मुंबई
सीबीडी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई : वाशी येथे गुढीपाडवानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा… https://t.co/2jrmCKw8Ui
(फोटो- नरेंद्र वास्कर)#GudiPadwa #GudiPadwa2023 #Vashi #NaviMumbai #Maharashtra pic.twitter.com/1fQfEPUi6C— LoksattaLive (@LoksattaLive) March 22, 2023
वाशी येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आणि त्यांच्यावरील विविध ग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली. सानपाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य ‘होर्डिंग’ आकर्षणाचे केंद्र ठरले.
३. ठाणे
येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपिनेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होऊन नागरिकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर कोपिनेश्वर मंदिरात श्री शिवशंकराचे दर्शन घेत नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त निघणारी पालखी खांद्यावर घेत स्वागतयात्रेला सुरुवात केली. pic.twitter.com/pbbzQdnRxk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 22, 2023
शिवाचा पुतळा असलेल्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. येथील शोभायात्रेत लहानग्यांनी केलेली मल्लखांब आणि हवेत कापडाच्या साहाय्याने केलेली योगासनांची प्रात्यक्षिके वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
४. डोंबिवली
नववर्ष शोभायांत्रांची जननी असलेल्या डोंबिवलीत कोरोना महामारीची २ वर्षे वगळता गेल्या २५ वर्षांपासून नववर्ष शोभायांत्रांचे आयोजन केले जाते. या वर्षीही येथील उत्साह कायम होता.
५. नाशिक
येथील शोभायात्रेत वृद्ध महिलांपासून लहान मुलींचा सहभाग असलेल्या लेझिम पथकांचे सर्वत्र कौतुक झाले. येथे शास्त्रीय नृत्यांगनांच्या पथकाने केलेल्या नृत्याने सर्वांचे लक्ष आकर्षून घेतले.
६. नागपूर
#WATCH | Maharashtra: Gudi Padwa is being celebrated. Visuals of vibrant celebrations from Nagpur pic.twitter.com/Zn2UnHapKF
— ANI (@ANI) March 22, 2023
🚩हिंदु नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने अतिशय प्रसन्न वातावरणात, पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात नागपुरात निघालेल्या स्वागतयात्रेत आज सकाळच्या रामपाऱ्यात सहभागी झालो.
🪷 अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव, आयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह हजारो नागपुरकर भगिनी-बंधूंच्या समवेत… pic.twitter.com/AVqQpuZGAy— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2023
येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि गुढीपूजन केले. ५१ फुटी उंच गुढी हे येथील शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते.
७. नगर
येथेही ‘चैत्र शोभायात्रा’ या नावाने शोभायात्रा काढण्यात आली.
८. बावधन (पुणे)
येथेही मोठ्या उत्साहात शोभायात्रा निघाली.