धुळे जिल्ह्यात ५ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपुजनाने हिंदु नववर्षाचे स्वागत आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प !
दोंडाईचा (जिल्हा धुळे) – महान हिंदु कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी, ८ लक्ष ५३ सहस्र १२५ व्या नववर्षाचा आरंभ या गुढीपाडव्याला होत आहे ! त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यात मोहाडी, दिवाणमळा, दोंडाईचा, धुळे शहरातील एम्.आय.डी.सी. येथे आणि जुने धुळे येथे सामूहिक गुढीपूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली.
हिंदूंनी गुढीपाडवा एकत्र येऊन साजरा केल्यास त्यातून हिंदूसंघटन आणि संस्कृतीजतन होते. गुढीपाडव्याच्या सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व ठिकाणी शंखनाद करून उंच गुढी उभारण्यात आली. गुढीचे शास्त्रोक्त पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व हिंदु धर्मप्रेमींनी नववर्षानिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा केली.
या वेळी गुढीपाडव्याचे ‘आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व’, तसेच ‘हिंदूंची महान कालगणना’ या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर हिंदु धर्मप्रेमी युवक आणि नागरिक उपस्थित होते. दोंडाईचा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक येथे ही गुढी उभारण्यात आली.