पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ !
‘वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्या बर्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो; म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.
१. पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.
२. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण अल्प असेल, तर अशा वेळी विहिरी इत्यादींचा उपयोग व्हावा; म्हणून लागणारे पाट, ताली इत्यादी सर्व साहित्य नीट करून ठेवता येते.
३. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करता येतो अन् येणार्या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते.
४. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत इत्यादी आणून ठेवता येते.’