इंदूरमध्ये ‘पी.एफ्.आय.’च्या गुप्तहेराला पकडून देणार्या अधिवक्त्यावर आक्रमण !
इंदूर (मध्यप्रदेश) – इंदूरमधील सदरबाजार भागात न्यायालयात ‘पी.एफ्.आय.’ या बंदी घातलेल्या संघटनेसाठी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करणार्या गुप्तहेराला पकडून देणार्या अधिवक्त्याला तिघा धर्मांधांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला कह्यात घेतले आहे. अधिवक्त्याला उपचारांसाठी एम्.वाय. रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष गडकर नावाच्या अधिवक्त्याचे कार्यालय इंदूरमधील टिळक मार्गवर आहे. जुनेद नावाचा एक मुसलमान तरुण त्याच्या भावाची भूमी घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात आला. अधिवक्ता मनीष यांनी त्याला कागदपत्रे दिली आणि त्यावर भावाची स्वाक्षरी आणण्यास सांगितले. संध्याकाळी जुनेद त्याच्या दोन मुसलमान साथीदारांसह आला आणि म्हणाला की, आजकाल तुम्ही फेसबुकवर मुसलमानांच्या विरोधात लिहिता. असे करू नका, अन्यथा तुम्हाला जीव गमवावा लागेल. त्यानंतर तिघांनीही अधिवक्त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या कार्यालयाच्या काचाही फोडल्या.
मनीष हिंदू महासभेशी संबंधित असून ते सामाजिक माध्यमांवरही सक्रीय असतात.त्यांनी अजानच्या वेळी वापरण्यात येणार्या भोंग्यांच्या विरोधात मोहीमही चालू केली होती.