ब्रिटनच्या खासदाराकडून भारतीय उच्चायुक्तालयावरील खलिस्तानी आक्रमणाचा विरोध
लंडन (ब्रिटन) – येथील भारतीय उच्चायुक्तालयावरील खलिस्तान्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमणाचा ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी विरोध केला आहे. त्यांनी लंडन पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय दूतावासावरील आक्रमणाची अमेरिकेकडून निंदा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को शहरातील भारताच्या वाणिज्य दूतावासावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केल्याच्या घटनेची अमेरिकेकडून निंदा करण्यात आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या समवेत काम करणार्या राजनैतिक अधिकार्यांची सुरक्षा करण्याची प्रतिज्ञा करत आहोत. आम्हाला आक्रमणासारख्या अशा घटना स्वीकारार्ह नाहीत.