‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक !
पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर (वय ८४ वर्षे) यांचे २१ मार्च या दिवशी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ देणार्या स्वामिनी सावरकर या अखेरपर्यंत सामाजिक कार्यात सक्रीय होत्या. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ७ वाजता पुण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक: #MahaMTB #SwaminiSavarkar @RanjitSavarkar #DrNarayanDamodarSavarkar https://t.co/qW8ZJVRxva
— महा MTB (@TheMahaMTB) March 21, 2023
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ३ भावंडे आणि त्यांच्या पत्नींनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. असे एकमेव उदाहरण म्हणजे सावरकर कुटुंब. बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर अशी ही ३ भावंडे होती. या क्रांतीकारकांचा जाज्वल्य विचारांचा वारसा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे आणि डॉ. नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव सावरकर यांनी पुढे नेला. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांची ! स्वामिनी यांनी पती विक्रम सावरकर यांच्यासोबत ‘प्रज्वलंत’ नावाच्या वृत्तपत्राचे काम सांभाळले. यासह मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही स्वामिनी सावरकर यांनी पाहिले.