राज्य सरकारी कर्मचार्यांच्या मागणीविषयी उचित निर्णय घेणार ! – मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांकडून संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत !
मुंबई, २० मार्च (वार्ता.) – राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्यांनी संवेदनशीलतेने संप मागे घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचार्यांच्या मागणीविषयी राज्यशासन पूर्णतः सकारात्मक असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी विधान परिषद आणि विधानसभेत २० मार्च या दिवशी निवेदनाद्वारे घोषित केले.