श्री संत वेणास्‍वामी मठाच्‍या वतीने गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रम !


मिरज – प्रतिवर्षीप्रमाणे मिरज येथील श्री संत वेणास्‍वामी मठ, ब्राह्मणपुरी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध श्रीरामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. या काळात पीठस्‍थ देवतांची महापूजा, पालखी, नैवेद्य, आरती, १३ प्रदक्षिणा, सांप्रदायिक उपासना, असे कार्यक्रम होतील. श्रीरामनवमीला प्रभु श्रीरामांचा जन्‍मकाळ होणार असून समर्थभक्‍त श्री. माधव गाडगीळ यांच्‍या वतीने सरबत वाटप होईल. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

श्रीरामनवमीच्‍या दिवशी श्री माधवराव गाडगीळ मित्रपरिवार आणि श्री दासबोध अभ्‍यास मंडळ मिरज यांच्‍या वतीने मुक्‍तांगण सभागृह श्री खरे वाचन मंदिर येथे सायंकाळी ६.३० वाजता गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी दुपारी ४ वाजता भव्‍य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सर्व उपक्रमांचा हिंदु बांधवांनी तन-मन-धन यांद्वारे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.