शारीरिक त्रास होत असतांनाही विश्रांतीच्या वेळेत वैजयंती माळा बनवण्याची सेवा करणारे सद़्गुरु सत्यवान कदम !
‘मंगळुरू येथे एकदा सद़्गुरु सत्यवानदादा एक सेवा करत होते. ही सेवा संपल्यानंतर विश्रांतीच्या वेळेतही ते वैजयंती माळा बनवण्याची सेवा करत असत. प्रत्यक्षात सद़्गुरु सत्यवानदादा यांना बसायला पुष्कळ त्रास होत असूनही ते सेवा करतात. तेव्हा ‘ते प.पू. गुरुदेवांच्या विचारांशी एकरूप आहेत’, असे जाणवले, तसेच एवढा त्रास होत असूनही ते सेवा करतात, याचे त्यांना कधीच कौतुक वाटत नाही. ते निरपेक्ष रहातात. त्यांनी जपमाळ करायला शिकतांना केलेली दोर्याची गुंडाळी मी संतांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ठेवली आहे. ती एका डबीत घालून पाठवत आहे. इतक्या आदर्श संतांच्या मार्गदर्शनाखाली साधकांना साधनेत हात धरून पुढे घेऊन जाणार्या गुरुदेवांचे (प.पू. डॉक्टरांचे) वर्णन शब्दांतून करू शकत नाही. केवळ व्यक्त करू शकते, तर ती कृतज्ञता !’
– कु. सर्वमंगला मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.