सद़्गुरु सत्यवान कदम यांची कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. कु. पूजा टोपकर (वय १६ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र
अ. ‘सद़्गुरु सत्यवानदादांच्या खोलीत सेवेला गेल्यावर माझा ‘सच्चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुदेव’ हा नामजप आपोआप चालू होतो.
आ. मला त्यांच्या खोलीत प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवते आणि सेवा करतांना ‘प.पू. गुरुदेव माझ्याकडे पहात आहेत’, असे वाटते.
इ. सद़्गुरु दादांच्या खोलीत अष्टगंधाचा सुगंध दरवळत असतो. ते जवळून जात असतांनाही मला अष्टगंधाचा सुगंध येतो.’
२. सौ. जयंती परब, कुडाळ सेवाकेंद्र
२ अ. काटकसरी : ‘सद़्गुरु दादा स्नानगृहातील साबणाचे लहान लहान तुकडे एकावर एक चिकटवून साबणाची वडी करतात.
२ आ. सतर्कता : एकदा सायंकाळी आम्ही अल्पाहार करत होतो. त्या वेळी ‘बाजूचा पंखा अनावश्यक चालू आहे’, हे आमच्या लक्षात आले नाही. सद़्गुरु दादा बाहेर जाण्यासाठी निघाले असतांना ते भोजनकक्षाच्या खिडकीजवळ आले आणि त्यांनी आम्हाला पंखा अनावश्यक चालू असल्याची जाणीव करून दिली.
२ इ. प्रीती : एकदा सेवाकेंद्रात आंबे आणले होते. मी एका आंब्याच्या फोडी करून सद़्गुरु दादांना दिल्या. तेव्हा आंबा खाण्यापूर्वी त्यांनी विचारले, ‘‘साधकांना दिले का ?’’ त्यांनी ‘सर्व साधकांना आंबा मिळाला आहे ना ?’, याची निश्चिती केली आणि नंतरच आंब्याची फोड खाल्ली.
२ ई. अनुभूती
२ ई १. सद़्गुुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन ऐकतांना नामजप आपोआप चालू होणे आणि नामजप रात्रभर चालू असणे : एकदा सद़्गुरु सत्यवानदादांचे साधकांना मार्गदर्शन होते. त्या कालावधीत सेवा करत असतांना माझा नामजप होत नव्हता. माझा नामजप होत नसल्याने मला सेवेतून आनंद मिळत नव्हता. सद़्गुरु दादांचे मार्गदर्शन ऐकतांना माझा नामजप आपोआप चालू झाला आणि नामजप रात्रभर चालू होता. मी दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावरही ‘माझा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले. त्या नामजपामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ‘साधक आणि समाजातील व्यक्ती यांची साधना होण्यासाठी सद़्गुरु कार्यरत असतात’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा माझ्याकडून त्यांच्याविषयी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.
२ ई २. सद़्गुुरु सत्यवानदादांच्या कपड्यांकडे पाहून चैतन्य आणि आनंद जाणवणे : एकदा सद़्गुरु दादांनी मला त्यांचे कपडे धुण्यासाठी दिले. त्या कपड्यांकडेे पाहून मला अतिशय चैतन्य जाणवत होते. त्यांचे कपडे पाहून ‘माझ्या हृदयात आनंदाचे कारंजे उडत आहेत’, असे मला जाणवले. मी ते कपडे अन्य २ साधकांना दाखवले. तेव्हा त्यांना त्यामध्ये प.पू. गुरुदेवांचे चरण दिसले.
२ ई ३. सद़्गुरु सत्यवान कदम रहात असलेल्या खोलीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
२ ई ३ अ. सद़्गुरु दादांच्या खोलीच्या बाहेर ३ – ४ मीटर अंतरावरूनच दैवी सुगंध येतो.
२ ई ३ आ. गारवा जाणवणे : एकदा मला उष्णतेचा त्रास होत होता. मी सद़्गुरु दादांच्या खोलीत सेवा करायला गेले. तेव्हा मला प्रचंड गारवा जाणवला. त्या वेळी मी १ घंटा सेवा केली, तरीही मला उष्णतेचा त्रास झाला नाही.
२ ई ३ इ. सद़्गुरु दादांच्या खोलीची स्वच्छता करतांना ‘वेगळ्याच विश्वात आहे’, असे जाणवणे : एकदा मला थकवा आला होता. मी सद़्गुरु दादांच्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. सद़्गुरु दादांच्या खोलीची स्वच्छता करतांना ‘मी वेगळ्याच विश्वात आहे आणि त्यांनीच माझ्याकडून खोलीची स्वच्छता करून घेतली’, असे मला जाणवले. सद़्गुरु दादांच्या खोलीतून बाहेर आल्यावर माझा थकवा दूर झाला.
२ ई ३ ई. खोलीतील सनातनच्या तीन गुरूंचे छायाचित्र सजीव झाल्यासारखे वाटणे : सद़्गुरु दादांच्या खोलीतील महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आशीर्वाद देतांनाचे काढलेले छायाचित्र सजीव झाल्यासारखे वाटते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आशीर्वाद देतांना त्यांच्या हातांतून प्रक्षेपित झालेल्या प्रकाशाची हालचाल होत आहे’, असे जाणवतेे.
२ ई ३ उ. सद़्गुरु दादांच्या खोलीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आहे. ‘त्या छायाचित्रातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याभोवती पाणी आहे’, असे मला वाटलेे. निळसर पाण्याकडे पाहून मला चांगले वाटलेे. ‘ते आपतत्त्वामुळे दिसत असावे’, असे मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |