शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांचे आंदोलन !
मुंबई, २० मार्च (वार्ता.) – शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विरोधी गटातील आमदारांनी २० मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून घोषणा देऊन निदर्शने केली. ‘आंबा, काजू, कांदा आणि कापूस पिकाला भाव मिळालाच पाहिजे’, ‘गारपीटग्रस्तांना हानीभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा त्यांनी या वेळी दिल्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. विरोधी गटातील आमदारांनी कांदा आणि द्राक्षे यांच्या टोपल्या घेऊन विधानभवनात प्रवेश केला, याच टोपल्या घेऊन त्यांनी पायर्यांवर बसून आंदोलन केले.